नवी दिल्ली । 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प 2024 जाहीर होणार आहे, त्याआधीच सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिला दिला आहे.भारत सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी केलं आहे. आयात शुल्कात 5 टक्क्यांची घट केली आहे. यामुळे आता मोबाईल फोन घेणं आणखी स्वस्त होणार आहे.
अर्थमंत्रालयाकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महसूल विभागाने 30 जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की, भारत सरकारच्या वित्त मंत्रालय अर्थात महसूल विभागाकडून क्रमांक 50/2017 सीमाशुल्क यांच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, मोबाईल तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आता 15 टक्क्यांऐवजी 10 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. आयात शुल्कात घट झाल्यामुळे मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post