मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावाजवळ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. बसचे टायर फुटल्यामुळे बस थेट बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. ही घटना घडली असून या अपघात बसमधील ९ प्रवाशी जखमी झाले आहे.
याबाबत असे की, मुक्ताईनगर आगाराची बस जळगाव जामोद येथून निघून काटेलधामकडे जात असतानाच मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसला अपघात आलं.
यावेळी धावत्या बसचे अचानक तयार फुटले. यामुळे यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली.
या अपघातामध्ये नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यात प्रतीक्षा सुनील झांबरे ( २२, रा. आळंद ); समाधान उखर्डु तायडे ( ६९, रा. मानेगाव ); कमल गोविंदा पवार ( ५९, रा. वढोदा ); जानकोर त्र्यंबक महाले ( ७५, रा. वढोदा); नलीनी भास्कर न्हावी ( ७०, रा. वढोदा); अनुराधा पाटील ( ३५, मेळसांगवे); कस्तुराबाई भोलणकर ( ७०, रा. शिरसोली); सपना विनोद पाटील ( २७, रा. जामनेर); सार्थक विनोद पाटील (२, रा. जामनेर) यांचा समावेश असून अपघातांवर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली आहे.
Discussion about this post