शिमला : हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यातील हरिपूरधार येथे एका खासगी बस अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढले जात आहे. बचाव कार्य वेगाने सुरू आहे. स्थानिक लोकांनी जखमींना रस्त्यावर आणले.
या घटनेनंतर घटनास्थळी आक्रोश सुरू झाला. अपघात इतका भीषण होता की बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, सिरमौरचे पोलिस अधीक्षक (एसपी) एनएस नेगी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी सांगितले की अंदाजे आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिस बचाव कार्यात सामील झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बस हरिपुरधार बाजारपेठेतून शिमल्याच्या दिशेने निघाली, त्याच वेळी हा अपघात घडला आहे. बाजारपेठेपासून अवघ्या १०० ते २०० मीटर पुढे जाताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून घसरून थेट खोल दरीत कोसळली.
बसमध्ये सुमारे ३६ हून अधिक प्रवासी होते, ज्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची पथकं सक्रिय झाली आहेत.















Discussion about this post