राज्यातील परिवहन विभागाच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून बसेसच्या अनेक दुर्घटना घडल्या आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. यातच आता प्रवाशांनी भरलेल्या भरधाव वेगात असलेल्या बसचं चाक निखळलं आणि 100 फूट लांब जाऊन पडलं. ही घटना परभणीच्या गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावर घडली असून सुदैवाने बसमधून प्रवास करणाऱ्या 62 प्रवाशांचा जीव वाचला आहे.
गंगाखेड आगाराची बस गंगाखेड हुन पालम कडे 62 प्रवासी घेऊन निघाली होते..गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी जवळ धावत्या बसचे चाक निखळले..तरीही बस धावत होती.ही बाब याच रस्त्यावरून जात असलेल्या पीक अप चालक भागवत मुंडे यांना दिसली त्यांनी तात्काळ बस चालकाला हातवारे करून आवाज करून लक्षात आणून दिले तेव्हा बसचालक यांनी ही बस थांबवली…महत्वाचे म्हणजे या बसचा वेग जास्त असल्याने टायर चक्क 100 फुटांपर्यंत जाऊन पडले..सुदैवाने पीक अप चालक भागवत मुंडे यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन बस चालकाच्या लक्षात आणून दिल्याने पुढील अनर्थ टळला.
छत तुटलं, तरीही एसटी नाही थांबली
एसटी महामंडळाच्या अनेक बस भंगार झाल्या आहेत. मात्र तरीही त्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील लालपरीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील एसटीचा पत्रा हा हवेत उडाला आहे. तरी या एसटीचा चालक ही बस भरधाव वेगाने चालवत आहे. सर्वसामान्यांचं प्रवासाचं हक्काचं साधन म्हणजे, लालपरी. मात्र त्याच लालपरीमधून प्रवास करणं गडचिरोलीमधील प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. यामध्ये महामंडळाच्या एसटीचे छत उडाले तरी एसटी भरधाव वेगामध्ये सुसाट धावत होती. सध्या राज्यात एसटी महामंडाळाची स्थिती फार बिकट आहे. त्यातच एसटी महामंडळाच्या या बसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
Discussion about this post