जळगाव | पाचोरा नजीक झालेल्या रेल्वे दुर्घटनेने मोठी खळबळ उडाली या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 10 मृतांची ओळख पटली आहे. 13 जण जखमी आहेत, सर्व जखमी प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मृतांचे नातेवाईक आले आहेत.
नेपाळमधील 4 जणांचे मृतदेह याठिकाणी आहेत. त्यांचा दफनविधी पुण्यात व भिवंडी येथे करण्यात येणार आहे. दुर्घटना मोठी होती, सुदैवाने मृत्यूचा आकडा तेरा वरच थांबला अन्यथा मोठी घटना झाली असती असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले. शासकीय महाविद्यालयात मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ते आले असतांना त्यांनी माध्यमांना माहिती दिली.
नेमकं काय घडलं?
दि. 22 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस बोगी मध्ये आग लागल्याची अफवा उठल्याने प्रवासी खाली उतरले त्याच वेळेस जळगाव कडे येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली काही प्रवासी येऊन 13 जणांचा मृत्यू झाला. यापैकी दहा मृतदेहांची ओळख पटलेली आहे व त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना तात्काळ म्हणून 50 हजार रुपये ची मदत करण्यात येत आहे. तर मृत नातेवाईकांच्या खात्यामध्ये नंतर एक लाख रुपये टाकण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत व तात्काळ मदत देण्यासाठी एसीएम गुड अभय शर्मा, सीनियर डीसीएम अजय कुमार सीनियर डीपीओ काझी, ए डी ओ सुनील परदेशी, कमर्शियल इन्स्पेक्टर योगेश ठोंबरे कमर्शियल रोहन बऱ्हाटे व कुलकर्णी कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post