बुलढाणा । महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एक अज्ञात व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे राज्यावर चीनच्या HMPV व्हायरसचे सावट असतानाच, बुलढाण्यात मात्र या नव्या ‘टक्कल व्हायरस’ने धुमाकूळ घातलाय.
लक्षणे काय ?
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात या अज्ञात व्हायरसने थैमान घातले आहे. या विषाणूची कुटुंब ची कुटुंब बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर हातात सरळ केस येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सरकारचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये भीती –
या अज्ञात विषाणूमुळे बोंडगाव, कालवड, हिंगणा या तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गेली आहेत. धक्कादायक म्हणजे, यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र एवढ्या भयंकर प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिन्न आहे, त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत.
बुलढाण्यातील नागरिकांनी या नव्या व्हायरसबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर करून सूचना देण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक स्तरावर विविध सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्था या व्हायरसच्या प्रतिबंधासाठी सक्रिय झाल्या आहेत.
Discussion about this post