बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी अनेकांचे अचानक केस गळती होत असल्याने खळबळ उडाली होती. आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखं गळती सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. या नखं गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल आहे. चार गावांमध्ये सध्या एकूण 29 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आले आहे
या परिस्थितीमुळे आता या परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी झाली. ICMR चे पथक आले. अनेक वेळी रक्ताचे नमुने घेतल्या गेलेत. मात्र, औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
Discussion about this post