नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अवघे ५० पेक्षा कमी जागा निवडून आले आहे. यामुळे राज्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नेतेही अस्वस्थ झाले आहे. यातच ‘मविआ’मधून काहींनी काढता पाय घेतला आहे अशातच आता बुलडाण्यात महाविकास आघाडीला मोठी खिंडार पडलं आहे. अनेक पदाधिकारांनी आपल्या पदाचे राजीनामे देत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यासह बऱ्याच गावातील आजी – माजी सरपंच व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे . त्यामुळे जिल्हतातील महाविकास आघाडीला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे.
चिखली विधान सभा मतदारसंघात आ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराला एक नवा आयाम मिळाला असून विधानसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या विजयानंतर आ.महाले यांच्या नेतृत्वाला अधिक लोकमान्यता मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (sp) या पक्षांना मोठे हादरे बसले आहेत. मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेश सचिव संजय गाडेकर, यांच्या सुविद्य पत्नी व तेल्हारा ग्रामपंचायतच्या सरपंच किरणताई गाडेकर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सोळंकी, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष निलेश अंजनकर, प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते पंकज कोठारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यासह बऱ्याच गावातील आजी – माजी सरपंच व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे . त्यामुळे जिल्हतातील महाविकास आघाडीला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. अनेक पदाधिकारी, नेते आणि सरपंचांच्या भाजपमध्ये प्रवेशाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे वर्चस्व संपुष्टात येऊ शकते. अनेकांनी उद्धव ठाकरे गट, शरद पवार आणि काँग्रेसची साथ सोडली आहे
Discussion about this post