बुलढाणा : लाचखोरीच्या एक मोठी बातमी समोर आलीय. ६० हजार रुपयांची रक्कम स्वीकरताना भूकर मापकास एसीबीच्या अडकला आहे. उमेश पंडीतराव सानप लाचखोराचे नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार येथील भूमी अभिलेख कार्यलयात कार्यरत भूकर मापक उमेश पंडीतराव सानप कार्यरत आहे. दरम्यान तक्रारदाराच्या प्लॉटची आखणी तसेच मोजणी लवकर करण्यासाठी लोकसेवक उमेश सानप यांनी ८० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती तक्रारदाराकडून ६० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते.
लाचलुचपत विभागाकडे तक्रार
मात्र सदर तक्रारदारास मोजणी करण्यासाठी लाच देण्याचे मान्य नसल्याने त्यांनी भूकर मापक पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार बुलढाण्याच्या लाच लुचपत विभाग यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने शहानिशा करत सापळा रचला होता. दरम्यान लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून उमेश सानप यांनी ६० रुपयांची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका हॉटेलात रंगेहाथ पकडले.
अटक करत गुन्हा दाखल
बुलढाणा एसीबीने लाच स्वीकारताना संशयित आरोपी लोकसेवक उमेश सानप यास एसीबीने ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
Discussion about this post