बुलढाणा । बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केल्यापासून अनेक अपघात घडत आहेत. दरम्यान, नागपूरहून पुण्याच्या दिशेने रवाना झालेल्या विदर्भ ट्रॅव्हलच्या बसचा भीषणण अपघात झाला. या अपघातामध्ये २५ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने अख्या महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, अपघातस्थळाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी वेगळीच शंका व्यक्त केली.
चालकाला झोप लागली असल्यानं अपघात घडला असावा, असं महाजन म्हणाले. ‘चालकाला डुलकी लागल्यानं अपघात झाला असावा असं प्रथमदर्शनी दिसत आहे. टायर फुटल्यानं अपघात झाल्याचं काही जण म्हणत आहेत. पण टायर फुटल्याच्या किंवा तो घासला गेल्याच्या कोणत्याही खुणा रस्त्यावर दिसत नाहीत,’ असं महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर सांगितलं.बसच्या चालकाला डुलकी लागली असावी.
त्यामुळेच बस लोखंडी खांब्याला धडकली. मग ती दुभाजकावर आदळली आणि नियंत्रण सुटून डाव्या बाजूला उलटली. बसच्या डाव्या बाजूला असलेली डिझेल टाकी फुटली. स्फोट झाल्यानं प्रवासी होरपळले, असं महाजन म्हणाले. बस जिथे पडली होती, त्या भागात रस्त्यावर डिझेल सांडल्याचं दिसत आहे, असं निरीक्षण महाजन यांनी नोंदवलं.
Discussion about this post