बुलढाणा! राज्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले असून यातच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघाताची एक घटना समोर आलीय. या दुर्दैवी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ते शेगाव रोडवर जयपुर लांडे फाटा समोर हा विचित्र अपघात झाला आहे. पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला मागून आधी एका चारचाकी वाहनाने धडक दिली, त्यानतंर एका खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले.
या तिहेरी अपघातात गाड्यांचेही बरेच नुकसान झाले. आज पहाटे पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 लोकं जखमी झालेत. त्यापैकी 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी तिहेरी अपघातामुळे मोठी खळबळ माजली असून अनेकांच्या जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Discussion about this post