देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी २०२५-२६ चा अर्थसंकल्पाचे वाचन करून त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पहिली आनंदवार्ता येऊन धडकली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत. ज्यात किसान क्रेडिट कार्डविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे.
या घटकांवर मोदी सरकारचे लक्ष
बजेट 2025 मध्ये खासकरून गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांच्या विकासावर भर देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. त्यानुसार, विविध योजना या घटकांच्या अवतीभवती असतील. जुन्या योजनांची मर्यादा वाढवण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. तर महिलांची अनेक स्टार्टअप्स आणि लघु, मध्यम उद्योगातील सक्रियता वाढवण्यासाठी या बजेट भाषणात घोषणांचा पाऊस पडत आहे. एकामागून एक घोषणा होत आहे.
शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये तरतूद-
– धनधान्य योजना शेतकऱ्यांसाठी लागू
-किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ₹3 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवली
-डाळींसाठी आत्मनिर्भरता मिशन – 6 वर्षांसाठी विशेष योजना
-युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता – पुरवठा वाढवण्यासाठी नवे पाऊल
-आसाममध्ये १२.७ लाख मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट उभारणार
-एमएसएमई वर्गीकरण नियमांत बदल
-गुंतवणूक मर्यादा 2.5 पट वाढणार
-उलाढाल मर्यादा दुप्पट होणार
-तूर, उडीद, मसूर यांसाठी 6 वर्षांसाठी विशेष अभियान
–केंद्रीय एजन्सी पुढील 4 वर्षांत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करणार
Discussion about this post