नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी मोदी सरकार 03 चा अर्थसंकल्प आज शनिवारी सादर केला. यादरम्यान, अर्थमंत्र्यांनी ३६ जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी, ३६ जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाणार असल्याची घोषणा केली. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करोग डे केअर सेंटर बांधले जाणार असल्याचे म्हटले. कर्करोगाच्या उपचारांसाठी औषधे स्वस्त होतील. ६ जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५% पर्यंत कमी केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान , अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे. सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे.यामुळे १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. सीतारामन म्हणाल्या की, गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल.
शेतीची वाढ, ग्रामीण विकास आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक क्षेत्रातील सुधारणांकडेही लक्ष देणार आहे. 100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजना सुरू करण्यात येत आहे. तसेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये झाली आहे
Discussion about this post