मुंबई । देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने दिवाळीनिमित्त एक खास ऑफर लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत BSNL नेटवर्कमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांना फक्त १ रुपयात अमर्यादित कॉल, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस संदेश मिळतील. ही ऑफर फक्त नवीन वापरकर्त्यांसाठी आहे. तुम्ही खाजगी टेलिकॉम कंपनीचे ग्राहक असाल आणि बीएसएनएलच्या ४जी नेटवर्कमध्ये सामील होऊ इच्छित असाल, तर तुम्ही या नवीन ऑफरचा लाभ घेऊ शकता. ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठी वैध आहे.
बीएसएनएल असे सांगितले आहे की, Diwali Bonanza 2025 ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे. ग्राहक या ऑफरचा फायदा 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या काळामध्ये घेऊ शकतात. सरकारी टेलिकॉम कंपनी नव्या ग्राहकांना 4G सेवा प्रदान करत आहे. त्यामुळे या कंपनीच्या नव्या ग्राहकांसाठी नवीन सिम खरेदी करण्याची ही एक उत्तम ऑफर आहे. या ऑफरअंतर्गत केवळ एका रुपयात नवीन सिम खरेदी करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदाच होणार आहे.
फक्त एक रुपयात अमर्यादित कॉल, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस संदेश मिळतील. तुम्ही फक्त १ रुपयात एक खरेदी करू शकता आणि या ऑफरचा लाभ घेण्यासाठी बीएसएनएल नेटवर्कमध्ये सामील होऊ शकता. ही योजना ३० दिवसांसाठी वैध आहे. त्यानंतर, तुम्ही रिचार्ज योजना निवडून तुमची सेवा वाढवू शकता.
ज्यांनी त्यांचा नंबर पोर्ट केला आहे त्यांना या ऑफरचा फायदा होईल का, याचे स्पष्ट उत्तर देशांतर्गत कंपनी बीएसएनएलने दिलेले नाही. मात्र, ही योजना नवीन वापरकर्त्यांसाठी आहे हे निश्चित आहे. एका अहवालानुसार, येत्या काही महिन्यांत सरकारी मालकीच्या कंपनीच्या ५जी सेवा देशभरात सुरू केल्या जाऊ शकतात.















Discussion about this post