सरकारी नोकरीच्या शोध घेणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएलने भरती जाहीर केली असून सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
बीएसएनएल ही कंपनी भारत सरकारअंतर्गत येते. या कंपनीत नोकरी करता येणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्ही www.bsnl.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही ७ मार्चऐवजी ३१ मार्चपर्यंत अर्ज करु शकतात.
बीएसएनएलमध्ये एकूण १२० पदांसाठी भरती केली जाणार आहे. सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदे भरली जाणार आहे. यामध्ये टेलिकॉम स्ट्रीमसाठी ४० जागा आहेत. फायनान्स स्ट्रीमसाठी ११ जागा आहेत. या नोकरीसाठी तुम्हाला या bsnl.co.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
बीएसएनएलमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मेरिट लिस्ट, कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४,९०० ते ५०,५०० रुपये पगार मिळणार आहे.
पात्रता
बीएसएनएलमध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेन टेलिकॉम ऑपरेशन्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स/कंप्यूटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन में बॅचलर ऑफ इंजिनियरिंग/बॅचलर ऑफ टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
फायनान्समध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंसी (CMA)पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.















Discussion about this post