सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. सीमा सुरक्षा दलाकडून ग्रुप बी आणि सी पदांसाठी भरतीची अधिसूचना अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र महिला आणि पुरुष उमेदवार 15 एप्रिलपर्यंत अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज फी भरण्यासाठी उमेदवारांना 15 एप्रिल 2024 पर्यंत वेळ आहे.
कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर अशा एकूण 82 रिक्त पदांसाठी पार पडत आहे. लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकिय तपासणीनंतरच उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 30 असणे आवश्यक आहे.
कोण अर्ज करू शकतो
कॉन्स्टेबल या पदासाठी दहावी पास उमेदवार देखील आरामात अर्ज ही करू शकतात.
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]















Discussion about this post