अहमदनगर | जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातुन एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्देवी घटना समोर आली असून शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण- भावाचा मृत्यू झाला. पायल संदीप पांढरे (इयत्ता तिसरी) आणि सुरज संदीप पांढरे (इयत्ता दुसरी) अशी या दोघांची नावे आहेत.
पाथर्डी तालुक्यातील अल्हनवाडी येथे ही घटना घडली आहे. ही दोघेही बहिण भाऊ निवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत होते. काल दुपारी (शुक्रवार, २७ ऑक्टोंबर) शेततळ्यावर गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, १५ दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली होती. खर्डा (Ahmednagar) येथून भुमकडे जाणाऱ्या शिर्डी- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गा लगत पाझर तलावावर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सुदैवाने एका वाटसरुमुळे आईचे जीव वाचवण्यात आले होते.