भडगाव । वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व कुठलीही कारवाई न करण्यासाठी दोन लाख 60 हजारांची लाच मागून त्यातील पहिल्या हप्त्यापोटी 50 हजारांची लाच स्वीकारणार्या भडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार किरण रवींद्र पाटील (41) यास जळगाव एसीबीने आज रंगेहात अटक केली. या कारवाईने जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे भडगाव येथील रहिवाशी असून त्यांना भडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत किरण रवींद्र पाटील यांनी
२५ रोजी तक्रारदाराकडे सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी हवालदार किरण पाटील याने तक्रारदार यांचेकडे 2,60,000 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या बाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. तक्रारीची दिनांक 25 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता किरण पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे 2,60,000 रु मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष 50,000/- रुपये लाच रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले . याबाबत भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पोलीस दलात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल हवालदार किरण पाटील यांचा नुकतेच प्रशस्ती पत्रक देऊन काल २५ जुलै रोजी सत्कार करण्यात आला होता . त्यांनतर लाचलुचपत विभागाच्या पथकाला मिळालेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
Discussion about this post