अमळनेर । अमळनेर पालिका कर्मचाऱ्याला दोन लाच हजार रुपयांची मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
मनोज साहेबराव निकुंभअसे या लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाणी पुरवठा कर्मचारी गणेश शिंगारे याच्या सुधारित आश्वसित योजनेचा दुसरा हप्ता मिळाला नव्हता. तसेच वेतन निश्चिती झाली नव्हती म्हणून त्यांनी निकुंभ यांची भेट घेतली. त्यांनी मला दोन हजार रुपये द्या, मी मुख्याधिकारीकडून सर्व मंजूर करून आणतो, असे सांगितले होते. याबाबत शिंगारे यांनी २१ ऑक्टोबर २०२४ रोजी जळगाव लघुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
एसीबीने सापळा रचला. मात्र निकुंभ यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र रेकॉर्डरमध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. कारवाई स्थगित झाली होती. याबाबत एसीबीने गणेश शिंगारे यांच्याशी वारंवार कारवाईबाबत संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. अखेरीस ३० नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळण्याचा अहवाल पाठवला होता. त्यावर ५ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षकांनी परवानगी दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना न्यायालयात नेले असता न्यायाधीश एल.डी. गायकवाड यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.















Discussion about this post