ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात विमान दुर्घटनेत 62 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विमान अचानक हवेत नादुरुस्त झालं. त्यानंतर हवेतच घिरट्या मारत हे विमान जमिनीवर कोसळलं.अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या विमान दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
ब्राझीलच्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचं होतं. प्रवाशांना घेऊन हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं.
या विमानातून 58 प्रवासी आणि 4 विमान कर्मचारी प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, उड्डाण भरल्यानंतर अचानक विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर वैमानिकाचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला.काही क्षणातच विमानाने हवेत घिरट्या मारण्यास सुरुवात केली. वैमानिकाने विमानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं. अखेर 62 प्रवाशांसह उंच आकाशातून विमान थेट जमिनीवर कोसळलं.
🚨🇧🇷Major plane crash in Brazil!
Expected dead 58 Passengers and 4 crew!
Plane exploded near houses but no people damaged yet on the ground hopefully.
More updates to come! pic.twitter.com/tgX4MS29ig
— James Rizk (@JamesRizk1) August 9, 2024
विमान कोसळल्यानंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. या आवाजाने आजूबाजूचा परिसर हादरला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथून आगीचे मोठे लोळ दिसत होते. या विमान अपघाताचा थरार काहींनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला.दरम्यान, विमान कोसळल्याचं कळताच संपूर्ण ब्राझील शहरात एकच खळबळ उडाली. विमान ज्या भागात कोसळलं तिथे अग्निशमन दलाची पथकं आणि बचाव पथकं तातडीने रवाना झाली. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.















Discussion about this post