नंदुरबार । राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेद्वारे महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरले जात आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सेतू केंद्रांना एकही रुपया मोबदला मिळत नाही. अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 50 रुपये मानधन दिलं जात आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात सेतू केंद्रांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरण्यास बहिष्कार टाकण्यात आला आहे.
जोपर्यंत सरकार मानधन देणार नाही तोपर्यंत या योजनेवर नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच सेतू केंद्रांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. यामुळे महिलांचं मोठ नुकसान होणार आहे. शासनाने आम्हाला अंगणवाडी सेविका प्रमाणे मानधन द्यावे, तेव्हाच आम्ही फॉर्म भरणार, असं सेतू केंद्रांकडून सांगण्यात येत आहे.
मोबाईलवर अर्ज भरण्याचा वेग कमी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. मोबाईल ॲप वरून महिलांना अर्ज भरता येत आहे. मात्र कम्प्युटरवर वेबसाईट अजूनही सुरू झालेली नाही. कम्प्युटरवर वेबसाईट सुरू नसल्याने मोबाईलवर कमी अर्ज भरले जात आहेत. कम्प्युटरवर सुरू झाल्यास कमी वेळात अधिक महिलांचे अर्ज भरले जातील. योजनेच्या लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला अनेक अडचणी आल्या होत्या. या योजनेला कुठलेही अडचणी येऊ नये यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहेत. शहरासह जिल्ह्यातील अनेक सायबर कॅफेंवर महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे.
Discussion about this post