जळगाव । ट्रॅक्टर अडवून वाळू व्यावसायिकाकडे केलेली पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने त्याला मारहाण करणाऱ्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये शनिपेठ पोलिस ठाण्याचे राहुल पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील सचिन साळुंके यांचा समावेश आहे.
बिलवाडी फाटा ते वावड़दा दरम्यान दोन जणांनी १७ एप्रिल रोजी रात्री १२:३० वाजता बोरनार येथील राकेश पाटील यांचे ट्रॅक्टर थांबवले व त्यांच्याकडे पैशांची मागणी करून मारहाण केली होती. बात राकेश पाटील यांच्या हाताचे बोट फॅक्चर झाले होते. या प्रकरणी राहुल पाटील, सचिन साळुंके यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले















Discussion about this post