मुंबई । मुंबई पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एक मोठा झटका दिला आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेत सध्या भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत 1 जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पण ठाकरे गटाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय.
सध्या ईडीकडून मुंबईत कडक कारवाई सुरु आहे. ईडीने गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण हे अडचणीत आले आहेत. तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय देखील अडचणीत आले आहेत. ईडीच्या या कारवाईवर ठाकरे गटाकडून टीका केली जातेय. अशातच ठाकरे गटाने 1 जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.
मात्र, मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मोर्चाची परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी ते विनंती करण्याची शक्यता आहे.
Discussion about this post