मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठामध्ये सिस्टिम ऑफिसर पदाच्या ८३ जागांसाठी नोकरभरती केली जात आहे.
या नोकरभरतीमध्येसिस्टिम ऑफिसर पदासाठी 54 रिक्त जागा असून सिनियर सिस्टिम ऑफिसर पदासाठी 29 रिक्त जागा आहेत. दोन्हीही पदांसाठी अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 ही आहे.
भरतीसाठी पात्रता?
सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदांसाठी पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे. सिस्टिम ऑफिसर पदासाठी उमेदवाराचं B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA चं शिक्षण पूर्ण हवं, नेटवर्क प्रमाणपत्राची आवश्यकता आहे किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर), RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्राची आवश्यकता आहे आणि संबंधित विभागाचा उमेदवाराकडे वर्षभराचा अनुभव आवश्यक आहे.
सिनियर सिस्टिम ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे B.E./ B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA आवश्यक आहे. नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. शिवाय, संबंधित विभागाचा 05 वर्षांच्या अनुभवाची गरज आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्जदारांना फी भरायची नाही. सर्वांनाच सरसकट मोफत आहे.
advertisement
एवढा पगार मिळेल?
सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदांसाठी 40,000 ते 46,000 रूपये इतका पगार असणार आहे.
वयाची अट : 29 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत अर्जदाराने 40 वर्षे पूर्ण केलेले असावे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जाची आणि ऑनलाईन जाहिरातीची लिंक अर्जदारांना बातमीमध्ये देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अर्जदारांनी अर्ज भराचा आहे.















Discussion about this post