सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीचा संधी आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही खंडपीठांसाठी लिपिक, शिपाई, लघुलेखक आणि चालक यासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
एकूण २३८१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तर ५ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
रिक्त पदाचा तपशील
या भरतीमध्ये क्लर्क पदासाठी १३८२ जागा रिक्त आहे. शिपाई पदासाठी ८८७ जागा रिक्त आहेत. ड्रायव्हर पदासाठी ३७ जागा रिक्त आहेत. स्टेनो लोअर पदासाठी ५६ जागा रिक्त आहेत तर स्टेनो हायर पदासाठी १९ जागा रिक्त आहेत.
पात्रता :
क्लर्क आणि स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांना टायपिंगचे ज्ञान असायला हवा. शिपाई पदासाठी उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २८ यामध्ये असावी. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिली आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला bombayhighcourt.nic.in या वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर होमपेजवरील अप्वाय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुमची सर्व माहिती भरुन अर्ज भरा.
यानंतर फी भरुन अर्ज सबमिट करा. अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.















Discussion about this post