जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळा अंतर्गत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने उद्या गुरूवार २४ ऑगस्ट रोजी “बोलीतील कवितांचे सादरीकरण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या दृक-श्राव्य सभागृहात दुपारी २:३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात धुळे येथील डॉ. सदाशिव सुर्यवंशी आणि अमळनेर येथील शरद धनगर हे दोन कवी बोलीतील कवितांचे सादरीकरण करतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी राहणार आहेत.
Discussion about this post