बँकेत नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. बँक ऑफ इंडियाकडून (BOI) भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण ४०० शिकाऊ पदांसाठी ही भरती होणार आहे.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झालीय. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे. पात्र उमेदवार BOI च्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी खाली वाचा.
काय आहे पात्रता आणि वयश्रेणी
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील पदवी किंवा केंद्र सरकारने मंजूर केलेली समकक्ष पात्रता असणं गरजेचं आहे. ही पदवी १ एप्रिल २०२१ आणि १ जानेवारी २०२५ दरम्यान प्राप्त केलेली असली पाहिजे. १ जानेवारी २०२५ पर्यंत अर्जदारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावं. उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९७ आणि १ जानेवारी २००५ दरम्यान झालेला असावा.
अर्ज फी
PwBD उमेदवार: रु ४०० + GST
SC/ST/सर्व महिला उमेदवार: रुपये ६०० + GST
इतर उमेदवार: रु ८०० + GST
Discussion about this post