बोदवड । बोदवड येथे फाटक तोडून ट्रक रेल्वे रुळांवर आल्याने सीएमएसटी – अमरावती एक्सप्रेस(12111) ला अपघात झाला. आज सकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.या अपघातात जिवीत हानी झाली नाही.
या बाबत माहिती अशी की मुक्ताईनगर कडून बोदवड कडे येणाऱ्या रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कडे जाणाऱ्या रस्त्याचा अंदाज न आल्याने तिकडून येणारा टी एन 52 एफ 7472 हा गव्हाचे पोते भरलेला ट्रक पूर्वीचे रस्त्याने जाणाऱ्या मार्गाचे बंद केलेले रेल्वे फाटक तोडून रेल्वे रुळांवर येऊन थांबला थोड्याच वेळात मुंबई कडून येणारी सी एम एस टी अमरावती एक्सप्रेस ही अमरावती कडे जाण्यासाठी येत होती रुळांवर ट्रक दिसताच रेल्वे चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवले परंतु तरीदेखील ट्रकला धडक बसली सुमारे 100 मीटर अंतरापर्यंत लोटत नेली, काल रेल्वे रुळाचे काम झाल्याने आज गाडीचा वेग ताशी 45 की मी असल्याने गाडी उलटली नाही.
सकाळी अपघात झाल्या नंतर तात्काळ रुळावरील ट्रक बाजूला काढण्याचे काम करण्यात आले व त्या नंतर रेल्वेचे रूळ व विजेच्या तारा व पडलेला खांब दुरुस्तीचे काम सुरू झाले भुसावळ, मलकापूर, खंडवा येथील पथक दुरुस्तीचे काम करत आहे .अपघात झाल्यानंतर तासाभरात परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली त्या द्वारे काही प्रवाशी पुढील प्रवासाला गेले तर काहींनी खाजगी प्रवासी गाड्या भाड्याने करून घेऊन पुढची स्वतःची व्यवस्था करून घेतली.सव्वा दहाचे सुमारास अमरावतीकडे डीझल इंजिन लावून गाडी रवाना करण्यात आली.अपघात स्थळी रेल्वे पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच ,बोदवड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी बंदोबस्त ठेवला आहे.
अपघातामुळे इटारसीमार्गे नागपूरकडे वळवलेल्या गाड्या
-मुंबई हावडा शालीमार 18029
-पुणे नागपूर हमसफर एक्सप्रेस 22141
-कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस 11039
-अहमदाबाद चेन्नई नवजीवन एक्सप्रेस12655
-मुंबई हावडा दुरांतो 12261
अनिश्चित काळासाठी एक विलंबाने धावत असलेल्या गाड्या :
-अहमदाबाद नागपूर प्रेरणा एक्सप्रेस- 22138
-मुंबई हावडा मेल- 12809
रद्द झालेली गाडी :
भुसावळ बडनेरा मेमो पॅसेंजर 61101
Discussion about this post