नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) कडून काही पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत.
160 हून अधिक पदांसाठी ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. शिक्षणाची आणि वयाची अट देखील या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये.
या पदांसाठी होणार भरती
या भरती प्रक्रियेतून रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट ॲनालिस्ट, सीनियर मॅनेजर आणि इतर काही पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 600 रूपये फीस ही भरावी लागेल.
प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख अगोदर 2 जुलै 2024 होती. मात्र, आता मुदतवाढ उमेदवारांना देण्यात आलीये. 12 जुलैपर्यंत उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. शेवटच्या तारखेनंतर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ही करता येणार नाहीत.
bankofbaroda.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
Discussion about this post