वडोदरा : गुजरातच्या वडोदरामधील हरणी तलावात पिकनिकसाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसोबत अपघात झाला. यात बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झाला असून या मृतांमध्ये 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी शाळेतील मुलं शाळेच्या सहलीसाठी आली होती. मात्र, काळानं घाला घातला आणि ही सहल विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरली. वडोदराच्या हरणी तलावात विद्यार्थी बोटिंग करत होते त्याचवेळी हा अपघात घडला.
तलावाच्या मध्यभागी बोट बुडाली आणि दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी उशिरा याप्रकरणी कारवाईही करण्यात आली असून हर्णी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 304,308 आणि 337 नुसार पाच आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारनंही मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.
Discussion about this post