बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इन्क्युबेशन मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाल मेलद्वारे तुमचा अर्ज पाठवायचा आहे.
स्माईल काउन्सिल आणि बृहन्मुंबईत महानगरपालिकेद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे मुलाखतीची तारीख तुम्हाला सांगितली जाईल.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२५ आहे. हा अर्ज तुम्हाला info.smile@mcgm.gov.in वर पाठवायचा आहे.
पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अंभियांत्रिकी, अर्थशास्त्र किंवा कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत उद्योजकता, मार्केटिंग, स्पेशलायझेशनमध्ये एमबीएला प्राधान्य देण्यात येईल. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ३ ते ५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. एका रिक्त जागेवर ही भरती केली जाणार आहे.















Discussion about this post