पदवीधरांना नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदभरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ३८ जागा भरल्या जातील. अर्ज थेट https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन सबमिट करायचा आहे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज २४ फेब्रुवारी २०२४ पासून स्वीकारण्यास सुरुवात होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२४ असणार आहे.
पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक (ह्युमन रिसोर्सेस कोऑर्डिनेटर)
आवश्यक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
पगार :
निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० रुपये पगार असणार आहे.
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – १००० रुपये.
मागासवर्गीय प्रवर्ग – ९०० रुपये.
Discussion about this post