मुंबई । येत्या दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून यात सगळ्याचे लक्ष मुंबईच्या BMC कडे असणार आहे. यातच BMC निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. जागावाटप हे प्रत्येक पक्षाच्या ताकदीवर अवलंबून असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
बुधवारी एका वृत्तावाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘२०१७ सालच्या निवडणुकीत भाजपकडे ८२ नगरसेवक होते. तर, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपचे १५ आमदार निवडून आले. जे इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील. मात्र, प्रत्येक पक्ष किती जागांवर लढणार हे त्यांच्या ताकदीवर ठरेल’.
जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये तीन टप्प्यांत होतील, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.मुंबईच्या विकासाबाबत फडणवीस म्हणाले, ‘मुंबई ही मुंबईच राहावी. तिला शांघाय किंवा सिंगापूरसारखे करण्याची गरज नाही.
मुंबईच्या विकासाबाबत फडणवीस म्हणाले, ‘मुंबईचे एक स्वत:चे एक वैशिष्ट्य आहे. मला वाटते की ते वैशिष्ट्य शांघाय किंवा सिंगापूरपेक्षाही चांगले आहे’.
बीडीडी चाळींबाबत फडणवीस म्हणाले, ‘काही मराठी माणसांनी मुंबई सोडली. तो दुरच्या भागात स्थायिक जरी झाला असला तरी, बीडीडी चाळीचं पुनर्वसन करत मराठी माणसाला घर देण्यात आलंय. त्यांना ५०० चौरस फूट फ्लॅट देण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे’, असंही फडणवीस म्हणाले.















Discussion about this post