सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी खुशखबर आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील गट क वर्गातील कार्यकारी सहायक अर्थात लिपिक पदासाठी मेगाभरती निघाली आहे. तब्बल १८४६ जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ९ सप्टेंबर २०२४ असून पात्र उमेदवारांनी त्यापूर्वी आपले अर्ज करावे
एकूण १८४६ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १४२, अनुसूचित जमातींसाठी १५० जागा, विमुक्त जाती- (अ) ४९ जागा, भटक्या जमाती (ब) ५४ जागा, भटक्या जमाती (क) ३९ जागा, भटक्या जमाती (ड) ३८ जागा, विशेष मागास प्रवर्ग- ४६, इतर मागासवर्ग ४५२, ईडब्लूएस- १८५, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मगास- १८५ आणि खुल्या प्रवर्गासाठी ५०६ जागा रिक्त आहेत. याशिवाय समांतर आरक्षणामध्ये वरील रिक्त पदांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे.
वयश्रेणी : किमान १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे
किती पगार मिळेल?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५००-८११०० बेसिक पगार मिळेल
कोण अर्ज करू शकतो.?
अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. (सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.)
संपर्क करा
मुंबई महानगरपालिकेने उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी आणि संभाव्य अडचणींसाठी ९५१३२५३२३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान उमेदवारांना संपर्क साधता येणार आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
Notification : PDF
Discussion about this post