बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल १८४६ लिपिक पदांसाठी भरती होत असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. मुदतवाढीसोबतच काही अटीदेखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही ज्या उमेदवारांनी अर्ज केला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या भरतीसाठी दहावी आणि पदवी परिक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावे ही अट रद्द करण्यात आली आहे. त्याचसोबत पदवी परीक्षेत ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण यातील ‘४५ टक्के गुण’ ही अट देखील रद्द केली आहे. त्याचसोबत तुम्ही आता ११ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकणार आहात.यापूर्वी प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरुन अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
या भरती अंतर्गत कार्यकारी सहायक या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६ ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी आरक्षण देण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
इतके वेतन मिळेल :
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. २५,५००-८१,१०० पगार देण्यात येणार आहे.
Discussion about this post