बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी भरती होत असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
या पदांसाठी होणार भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नायर बालरोग विभागा सहाय्यक प्राध्यापक बालरोग, क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या पदांसाठी भरती कली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (BMC Recruitment)
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. १० मार्च २०२५ पर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात.तीन रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. २४ फेब्रुवारीपासून भरती सुरु झाली आहे. यासाठी तुम्हाला अर्ज डिस्पॅच सेक्शन, जी-बिल्डिंग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल तळमजला, मुंबई – ४००००८ येथे अर्ज पाठवायचा आहे.
पात्रता काय?
या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या वेबसाइटवर देण्यात आली आहे.सहाय्यक प्राध्यापक पदासाठी M.D/D.N.B Pediatrics पदवी प्राप्त केलेले असावी. क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ पदासाठी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एम.ए पदवी प्राप्त केलेली असावी.
किती पगार मिळेल?
या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक बालरोग पदासाठी १ लाख १० हजार रुपये पगार मिळणार आहे. मानसशास्त्रज्ञ पदासाठी ५० हजार तर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदासाठी ३० हजार रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे असावी.
Discussion about this post