नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. एकूण 115 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 19 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
भरतीसाठी रिक्त पदे आणि संख्या
कार्यक्रम समन्वयक (Programme Coordinator): 24 जागा
आहारतज्ञ (Dietician): 33 जागा
कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant): 02 जागा
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator): 30 जागा
एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू (NCD Corners MPW): 26 जागा
वयश्रेणी :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 ते 45 वर्षे
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहाय्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी.
डेटा एंट्री ऑपरेटर: कोणत्याही शाखेतील पदवीधर.
एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) किंवा समकक्ष/उच्च परीक्षा मराठी विषयासह (उच्चस्तर/निम्नस्तर) उत्तीर्ण.
कार्यक्रम समन्वयक: एम.बी.बी.एस. किंवा बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस./बी.डी.एस. यांसारख्या वैद्यकीय शाखेतील महाराष्ट्र वैद्यकीय परिषद किंवा राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त पदवी.
आहारतज्ञ: मान्यताप्राप्त विद्यापीठातून आहारतज्ञ शाखेतील बी.एस्सी. पदवी आणि यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून न्यूट्रिशन अँड डायटेटिक्समधील पदव्युत्तर डिप्लोमा/एम.एस्सी./मास्टर्स पदवी.
पदांनुसार वेतनश्रेणी
कार्यक्रम समन्वयक: 40,000 रुपये प्रतिमहिना
आहारतज्ञ आणि कार्यकारी सहाय्यक: प्रत्येकी 30,000 रुपये प्रतिमहिना
डेटा एंट्री ऑपरेटर: 18,000 रुपये प्रतिमहिना
एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू: 17,000 रुपये प्रतिमहिना
Discussion about this post