जळगाव : शहरातील असोदा रोडवरील मोहन टॉकीजजवळ घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध व्यापाराची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा उघड केला आहे. या कारवाईत तब्बल 61 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिस अधीक्षक कावेरी कमलाकर यांना घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोहन टॉकीज परिसरात धाड टाकली. या कारवाईत 33 घरगुती गॅस सिलेंडर आणि 28 व्यावसायिक गॅस सिलेंडर असा एकूण 61 अवैध गॅस सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय काळाबाजारात वापरले जाणारे साहित्य, वजन काटा आणि गॅस वाहतूक करणारे वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संशयित पोलीसांच्या ताब्यात
या प्रकरणी राहुल नारायण सोनवणे (वय २९), राकेश नारायण सोनवणे (वय २५, दोघेही रा. पिवळी भिंत, मोहन टॉकीज परिसर) आणि आदेश राजू पाटील (वय २३, रा. मोहन टॉकीज परिसर) या तिघांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Discussion about this post