जळगाव । जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून अशातच भाजपने माजी नगरसेवकांसह तब्बल 27 पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली. भाजपनं केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकारणासह राज्यातही खळबळ उडलीय.
या कारणामुळे हकालपट्टी?
जळगाव महानगरपालिकेत महायुती धर्म न पाळणाऱ्या भाजपच्या बंडखोरांवर पक्षाने कारवाई आहे. जळगाव महानगरपालिकेत युतीधर्म न पाळणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बंडखोरांवर पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आहे.
भाजपकडून करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. भाजपच्या नावाचा आणि पक्षाच्या प्रतिमेचा गैरवापर करत काही अपक्ष उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.
हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यादी:
१: पाटील संगिता गोकुळ
२: हर्षदा अमोल सांगोरे
३: बाविस्कर धनश्री गणेश
४: बाविस्कर गणेश दत्तात्रय
५: सपकाळे रंजना भरत
६: कांचन विकास सोनवणे
७: शिंपी प्रमोद शांतांराम
८: सपकाळे भरत शंकर
९: बागरे हिरकणी जितेंद्र
१०: चौधरी चेतना किशोर
११: बारी मयुर श्रावण
१२: पाटील तृप्ती पाडुरंग
१३: पाटील सुनिल ज्ञानेश्वर
१४: विकास प्रल्हाद पाटील
१५: भोळे गिरीष कैलास
१६: कैलास बुधा पाटील (सुर्यवंशी)
१७: हेमंत सुभाष भंगाळे
१८: जितेंद्र भगवान मराठे
१९: प्रिया विनय केसवानी
२०: चौधरी रुपाली स्वप्नील
२१: अंजू योगेश निंबाळकर
२२: चौथे मयुरी जितेंद्र
२३: वंजारी जयश्री गजानन
२४: पाटील ज्योती विठ्ठल
२५: घुगे उज्वला संजय
२६: ढाकणे दिनेश मधुकर
२७: मोरे कोकीळा प्रमोद















Discussion about this post