देशात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याच दरम्यान आता पश्चिम बंगालमधील नादियामध्ये एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हफीझुल शेख असं मृ्त्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय.
चहाच्या दुकानात हफिजुल शेख उभे होते. तेव्हा त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा पीडित भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित दोघांवरही गुन्हे नोंद आहेत. मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. परंतु अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
पश्चिम बंगालमध्ये २२ मे रोजी देखील अशीच एक घटना घडली होती. नंदीग्राममध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या हाणामारीमध्ये भाजपचे सात कार्यकर्ते जखमी झाले होते. ही घटना २२ मे रोजी रात्री नंदीग्राममधील सोनचुरा येथे घडली होती. तेथे भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.















Discussion about this post