भोपाळ | मध्य प्रदेशात भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावावरची सस्पेंस आठ दिवसांनंतर अखेर आज संपली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आता मोहन यादव यांची वर्णी लागला आहे. मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देणं हे भाजपचं मोठं धक्कातंत्र असल्याचं मानलं जात आहे. यासोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली. जगदीप देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण बनेल? याबाबत उत्सुकता होती. अनेक दिग्गज नेत्यांची नावे शर्यतीत होती. पण भाजपने धक्कातंत्र देत मोहन यादव यांची निवड केली आहे.
मोहन यादव हे शिवराज सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. ते उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर आता ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे असल्याची सध्या चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांचा हा प्रस्ताव आमदारांनी बहुमताने मान्य केला. यासोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली. जगदीप देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.
Discussion about this post