स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. यातच मित्र पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. अमरावतीमध्ये जगदीश गुप्ता यांचे मोठं वजन आहे, त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. लवकरच गुप्ता यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुद्धा अमरावतीमध्ये सुरू आहे. जगदीश गुप्ता हे अमरावती विधानसभेचे दोन वेळा आमदार व एक वेळा विधान परिषदेचे आमदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. ४ महिन्यात अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे
या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांची भूमिका निर्णायक असणार आहे. जगदीश गुप्ता शिंदे सेनेत गेले तर शिंदे गट अमरावती शहरात मजबूत होणार आहे. भाजपचे मात्र प्रचंड या ठिकाणी नुकसान होऊ शकते. जगदीश गुप्ता यांच्यासोबत हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा एक मोठा गट असून याचा फटका अमरावती महानगरपालिकेत भाजपला बसण्याची शक्यता आहे.
Discussion about this post