जळगाव । राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत पक्षाने आदेश दिला तर नक्की उडी घेऊ, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, रावेरमध्ये कोणीही उभं राहिलं तरी आगामी लोकसभा निवडणूक रक्षा खडसेच (रावेरच्या विद्यमान खासदार) जिंकणार. रक्षा खडसे या निवडणुकीत तब्बल दोन लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीच्या जळगावातील सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उद्देशून म्हणाले, रावेर लोकसभेचा धनुष्यबाण तुम्ही उचलावा. तर, एकनाथ खडसे यांनी देखील जयंत पाटलांच्या विनंतीला अनुकूलता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे म्हणाले, मी लोकसभेची निवडणूक लढवण्यास फार इच्छूक नाही. परंतु, पक्षाने जबाबदारी सोपवल्यास ती जबाबदारी मी निभावेन.
एकनाथ खडसे म्हणाले, 1989 साली रावेर लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत पोटनिवडणुकांसह रावेरमध्ये एकूण 10 निवडणुका झाल्या. यापैकी 9 वेळा तिथे काँग्रेसचा पराभव झाला आहे. केवळ एकच निवडणूक काँग्रेसला जिंकता आली आहे. काँग्रेसने एकदाच केवळ 13 महिन्यांसाठी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला होता. ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली आणि पक्षाने मला आदेश दिला तर मी पक्षानी दिलेल्या आदेशाचा विचार करेन.
भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
भारतीय जनता पार्टीने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याबाबत म्हणाले, रावेरमध्ये कोणीही उभं राहिलं तरी आगामी लोकसभा निवडणूक रक्षा खडसेच (रावेरच्या विद्यमान खासदार) जिंकणार. रक्षा खडसे या निवडणुकीत तब्बल दोन लाख मतांनी विजयी होतील, असा दावा देखील त्यांनी केला.
Discussion about this post