मुंबई । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. कारण रायगडमध्ये भाजपचे भंडखोर दिलीप भोईर यांनी शिवसनेते प्रवेश केला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप भोईर यांनी तिकिट न मिळाल्यामुळे बंडखोरी केली होती. भोईर हे शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्या विरोधात रिंगणात उतरले होते. विधानसभा निवडणुकीत भोईर यांचा पराभव झाला होता. बंडखोरी केल्यामुळे दिलीप भोईर यांच्यावर भाजपने कारवाई केली होती. आता दिलीप भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी अलिबाग येथे एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.
Discussion about this post