रावेर । भाजपने रावेर लोकसभा क्षेत्रातून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मात्र रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यांनतर या निर्णयाला विरोध करीत यावल, रावेर, भुसावळ तालुक्यातून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. हे लोण बोदवड तालुक्यात पोहोचले. या घडामोडीनंतर ‘अॅक्शन मोड’वर आलेल्या भाजपने गुरुवारी दुपारनंतर लोकसभा क्षेत्रात केंद्रीयस्तरीय सर्वेक्षण सुरू केल्याचे समोर आले आहे. जर भाजपने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला तर मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ यांना जाहीर केलेली उमेदवारी १२ दिवसानंतर बदलली होती. त्याची पुनरावृत्ती रावेर मतदारसंघात होईल का, असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते आता एकमेकांना विचारू लागले आहेत. त्याचे कारण राजीनामा सत्रानंतर पक्षाने पदाधिकारी आणि विविध जबाबदान्या सांभाळणाऱ्या ‘प्रमुखां’चे एक सर्वेक्षण सुरू केल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी नको, असा पवित्रा घेत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सामूहिक राजीनामे दिले होते. काहींनी हे राजीनामे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवले, गुरुवारी दुसऱ्या दिवशी सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्रातील तालुक्यांमधून विरोधाचे सूर उमटले, बोदवडच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे तालुकाध्यक्षांना पाठवले. यानंतर गुरुवारी दुपारनंतर भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय स्तरावरील सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याचे समोर आले















Discussion about this post