मुंबई । बेलापूर मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना मंगळवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. रात्री साधारण अडीचच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी त्वरित तपासणी करून रात्रीच त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या हृदयात दोन स्टेंट बसविण्यात आल्याची माहिती त्यांचे सुपुत्र निलेश म्हात्रे यांनी दिली. सध्या मंदा म्हात्रे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचेही कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. बेलापूर मतदारसंघातून त्या विधानसभेत प्रतिनिधित्व करत असून पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि मच्छीमार समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे.














Discussion about this post