नवी दिल्ली । अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजप आमदार रामदुलार गोंड यांना न्यायालयाने 25 वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाखांचा दंड ठोठावला आहे.दंडाची रक्कम पीडितेला मिळणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
रामदुलार गोंड हे उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील दुधी मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रामदुलार गोंड यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2014 मध्ये महापौरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ वर्षांच्या दीर्घ सुनावणीनंतर हा निकाल आला आहे.
आमदारकी होणार रद्द?
आठ वर्षे चाललेल्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्यायालयाचे न्यायाधीश एहसानुल्ला खान यांनी दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. आदेशानंतर रामदुलार गोंड यांचे आमदारकी रद्द होईल, असं बोललं जात आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आमदारांच्या वकिलांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी, 12 डिसेंबर रोजी न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजप (BJP News) आमदार रामदुलार गोंड (MLA Ramdular Gond News) यांना दोषी ठरवले होते. मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाचे न्यायाधीश एहसानुल्ला खान यांनी शिक्षेसाठी 15 डिसेंबरची तारीख निश्चित
आमदार (BJP MLA) रामदुलार गोंड यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबद्दल पीडितेच्या भावाने आनंद व्यक्त केला. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आलेल्या पीडितेच्या भावाशी या संदर्भात प्रश्न विचारला असता, त्याने सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयाने खूप आनंदी आहे. नऊ वर्षांच्या संघर्षानंतर आज त्यांना न्याय मिळाला आहे. पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून रामदुलार गोंडवर नऊ वर्षांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Discussion about this post