मुंबई । जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत उपाध्यक्षपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यात वाद झाला होता.या प्रकरणी राडा झाल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे देखील दाखल झाले होते. मात्र अशातच राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची कथित ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बबनराव लोणीकरांनी राजेश टोपे यांना शिवीगाळ केल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.
जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून झालेल्या वादातून या दोन्ही आमदारांचा वाद असल्याचे बोलले जात आहे. मुलगा राहुल लोणीकर याला उपाध्यक्ष पद न मिळल्याने लोणीकर यांनी टोपे यांना शिवीगाळ केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या प्रकरणानंतर राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकर यांनी राजेय टोपे यांना शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. मात्र या व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता पाडळून बघितलेली नाही. मात्र याचे पडसाद येत्या काळात जालन्यातील राजकारणात पडू शकतात.















Discussion about this post