मुंबई । लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे १० आमदार शिंदे गटात जातील, असा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उलट सूलट चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. नारायण राणे यांना भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच नारायण राणे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे
याच दरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे १० आमदार शिंदे गटात जातील, असा दावा केला. उर्वरित ६ आमदारांपैकी किती आमदार ठाकरे गटात राहतील हे सांगता येत नाही. पुढच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना कायमचीच सुट्टी मिळेल, असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उलट सूलट चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.















Discussion about this post