आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत असून अनेक पक्षात पक्षांतर होताना दिसत आहे. अशातच भाजपला एक मोठा धक्का बसला आहेत. विदर्भातील बडा नेता भाजपला सोडचिठ्ठी देत आहे. हा नेता भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.
भंडारा-गोंदियाचे भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा पक्षप्रवेश मुंबईत होत आहे. वरिष्ठ नेत्यांकडून झालेले दुर्लक्ष आणि पक्षाकडून सुरू असलेल्या अवहेलनामुळे ते भाजपमधून बाहेर पडलेले आहेत.
एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र अशातच शिशुपाल पटले यांचा काँग्रेस प्रवेश भाजपसाठी मोठा झटका आहे.
शिशुपाल पटले हे पोवार समाजाचे नेते आहेत. त्यांची राजकीय ताकद मोठी आहे. भंडार गोंदीया मतदार संघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजप सोबत एकनिष्ठ राहिले होते. परंतु वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना डावलले गेले. त्यांना पक्षीय कार्यक्रमात न बोलावणे, कार्यक्रमांच्या पत्रिकेत त्यांचे नाव न टाकणे, व्यासपीठावर स्थान न देणे, भाषण करण्याची संधी न देणे, असे प्रकार पटले यांच्यासोबत झाले. त्यामुळे ते भाजपमध्ये नाराज झाले
Discussion about this post